Why was the atrocity registered? : ऍट्रॉसिटी दाखल का केली म्हणून मंगनाळीच्या फिर्यादीला आरोपीच्या नातेवाईकांकडून खोट्या केसेस व जीवे मारण्याच्या धमक्या
नांदेड| कंधार तालुक्यातील मंगनाळी येथील मातंग समाजातील युवक उद्धव विठ्ठल दूधकावडे याला व इतरांना मंदिर देवस्थान हिशोब संदर्भात वाद घालून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती.
दि.३ मार्च रोजी पोलीस ठाणे कंधार येथे मंगनाळी येथील निवृत्ती कपाळे व इतर ११ सवर्ण असलेल्यावर ऍट्रॉसिटी व बीएनएस कलमन्वये इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमच्या नातेवाईकांवर केस केस का केली म्हणून हणमंत विठ्ठल शिंदे व शिवाजी रामराव शिंदे यांनी व इतर काही गावातील व पेठवडज येथील आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी व त्याच्या जवळच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात येत आहे.
शिवाजी शिंदे याने फिर्यादीचे काका मरिबा दूधकावडे यांना गावात केस का केली म्हणून लाथा बुक्यानी मारहाण केली आहे. गावातील महादेव मंदिर देवस्थान व गोविंद महाराज देवस्थानकडे ३० लक्ष रुपये जमा आहेत. ते सर्व पैसे ऍट्रॉसिटी केस केलेल्या लोकांचा काटा काढ...
