Homeक्राईमCows Caught : हिमायतनगरला विनापरवाना वाहतूक करतांना गोवंश पकडले. राज्यात गोमातेला राज्य...

Cows Caught : हिमायतनगरला विनापरवाना वाहतूक करतांना गोवंश पकडले. राज्यात गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळूनही गोहत्या सुरूच

नांदेड/हिमायतनगर। हिमायतनगर पोलीसांनी विनापरविना गोवंशाची वाहतूक करतांना चार चाकी वाहन पकडून कारवाई केली आहे. हि कारवाई ता. २४ गुरूवार सकाळी पावने नवू वाजाताच्या दरम्यान करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्याप्रमाणात गोवंशाची वाहतूक व विक्री होत असल्याची माहीती असून उमरखेड हा केंद्रबिंदू ठरत आहे.उमरखेड ते हिमायतनगर मार्गे निर्मल तेलंगणात दररोज शेकडो गोवंश नेण्यात येत असल्याचे ही सांगण्यात येते. दरम्यान हिमायतनगर नजीक गणेशवाडी ज्ञानेश्वर ढोणे यांच्या घरासमोर ११ गोवंशाची त्यांच्या जिवितास इजा पोहचेल असे दाटीवाटीने वाहतूक करतांना चारचाकी वाहन पोलीसांना मिळून आले.

या मध्ये ६ गायी व ५ गोरे असा समावेश आहे. फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोबरा जाधव यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आरोपी युनूस आयूब वय ३४ वर्ष रा. उमरचौक हिमायतनगर यांचे विरूद्ध प्राणी छळ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ११ गोवंश किंमत १ लाख ३७ हजार रूपये, एक टाटा योद्धा टेम्पो क्र. एम.एच. २६ सी.एच. १४४६ किंमत ४ लाख असा एकून ५ लाख ३७ हजार असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

आरोपींस पोलीसांनी अटक केली असून त्या ११ गोवंशाची रवानगी पवना येथील देवकृपा गोशाळेत करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव हे करीत आहेत.दरम्यान दुसर्या घटनेत इस्लापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास गोंडेमहागाव ते धावजीनगर रस्त्यावर चार गोवंश चारचाकी वाहनामध्ये कोंबून निर्दयी पणे वाहतूक करतांना ४ जनावरें किंमत ६३ हजार व वाहण क्रमांक टी. एस.०१ युए ५५९९ किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

पोकाॅ. प्रफूल जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद इम्रान सय्यद सयीद वय ३५ वर्ष रा. मुगलपुरा ताजि.निर्मल तेलंगणा याचे विरुद्ध इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकाॅ पठाण हे करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments