HomeनांदेडMahur Accident ; कारची बैलगाडीला जबर धडक; शेतकरी जागीचं ठार ; दोन्ही...

Mahur Accident ; कारची बैलगाडीला जबर धडक; शेतकरी जागीचं ठार ; दोन्ही बैलाचे पाय निकामी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील उमरा गावाजवळ बैलगाडी घेऊन आपल्या शेतात जात असलेल्या शेतकरी यांच्या बैलगाडीला ईर्टिगा कारने जोराची धडक दिल्याने ३४ वर्षीय युवा शेतकरी ठार तर दोन्ही बैलाचे पाय निकामी झाल्याची घटना शुक्रवार दि,२५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वा घडली.

माहूर तालूक्यातील उमरा तांडा येथील शेतकारी दिलीप बळीराम जाधव वय ३४ यांची मेट शिवारात शेती आहे, व सध्या शेतात ओलीताचे पिक असल्याने व रात्री ची लाईन असल्यामुळे ते पाणी देण्या करीता रात्री ११.३० वा शेतात बैलगाडी घेऊन जात होता उमरा व मेटच्या पुलावर आला असता समोरुन येणा-या ईर्टिगा कार क्र,टि.एस. ११.इपी १४७३ ने जोरदार धडक दिली.

IMG 20250426 WA0039 Mahur Accident ; कारची बैलगाडीला जबर धडक; शेतकरी जागीचं ठार ; दोन्ही बैलाचे पाय निकामी

आवाज ऐकून गावक-यानी घटनास्थळी धाव घेतली व माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैघकिय अधिकारी डॉ विपिन बावळे यांनी दिलीपला मुत्यु घोषित केले, गाडीला असलेले दोन्ही बैलाचे पाय निकामी झाले,घटनास्थळावर सिदखेड पोलीसांनी धाव घेऊन कार चालकास ताब्यात घेतले दिलीप च्या पाश्चात्य आई वडिल ऐक मुलगा व मुलगी आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments