नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गोर गरीब मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणुन लढा देत आहेत, अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे त्यांनी आतापर्यंत जेवढे आमरण उपोषण केलेत तेवढे मराठा समाजाचे पोरं तरी राज ठाकरेनी नौकरिला लावलेत का? हा प्रश्न विचारत जरांगे पाटलांवार बोलायची लायकी त्यांची नाही असा सवाल नांदेड मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आणि जरांगे पाटील यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडाडून विरोध केल्या जातोय, त्या रोषाला त्यांना नांदेड मध्ये सुद्धा सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांचा ताफा नांदेड मध्ये दाखल होताच शासकीय विश्रामगृहा समोर त्यांचा सकल मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करत कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करीत थेट राज ठाकरेंची गाडी गाठली व थेट घोषणाबाजीला सुरुवात केली.
मनोज जरांगे पाटील हे अतिशय पोटतीडकीने समाजासाठी लढा देत आहेत त्यांच्यावर आणि मराठा आरक्षणावर बोलायची आपली पात्रता नाही या शब्दात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. जर तुम्ही जरांगे पाटलांनी जेवढे आमरण उपोषण केले तेवढे पोरं तरी नौकरीला लावले का..? असा सवाल करीत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुणांचे डोके कोण भडकवातेय हे राज्यातील जनतेला चांगलं माहिती आहे. त्यामुळे डोके भडकवण्याचा आरोप तुम्ही मराठ्यांवर लावू नका आणि जरांगे पाटलावर इथून पुढे बोलु नका असा खरमरीत ईशारा मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिला .
सोबत नाना पाटील वानखेडे, ऋषीं पाटील वानखेडे,दत्ता पाटील खराटे, गोविंद पाटील दुगावे,राजु पाटील सूर्यवंशी, शिवशंकर भोसले, सोमनाथ सूर्यवंशी, प्रशांत पाटील भोसले, संभाजी भोसले, अनिकेत भोसले, विठ्ठल शिंदे, नागोराव जामगे, तिरुपती भगणूरे यांच्या सह असंख्य समाज बांधव रात्री उशीरा पर्यंत पोलीस स्थानकात स्थानबाध करून सोडुन देण्यात आले व श्याम पाटील वडजे यांच्यासह इतर चार जणांवार गुन्हे दाखल करण्यात आले.