हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रसिद्ध श्री परमेश्वर यात्रेतील अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सोहळा व धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतेले. प्रसांगी श्री परमेश्वर देवाच्या कैलेंडरचे प्रकाशन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले.


विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक भक्त हजेरी लावतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले होते. यावर्षी मंदिर समितीने श्री मूर्तीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवीदेवतांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र हिमायतनगर (वाढोणा) येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला चांदीची नक्षीदार झळाळी लावली आहे. तसेच मुंबई येथून दोन किलो सोन्याचे दागिने बनवून आणण्यात आले असून, आता मंदिराच्या अलंकाराचे वजन 3 किलो झाले असून, महाशिवरात्रीला सोन्याचे आभूषणे तहसीलदार यांच्या उपस्थितीत श्रीच्या अंगावर चढविण्यत आले आहेत. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी अलंकारमय श्रीचे दर्शन घेतले आहेत.

याचं अलंकारमय श्री परमेश्वर मूर्तीचे कैलेंडर मंदिर समितीने दर्शनार्थी भाविक भक्तांना भेट म्हणून वितरित करण्यासाठी छापले आहेत. नुकतेच कैलेंडर उपलब्ध झाले असून, श्री परमेश्वराच्या कैलेंण्डरचे प्रकाशन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, मंदिराचे संचालक प्रकाश कोमावार, वामनराव बनसोडे, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, श्रीमती लताबाई पाध्ये, सौ लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड.

यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, गणेश पाळजकर, विजय वळसे, विठ्ठल देशमवाड, गजानन तुप्तेवार, रामभाऊ सूर्यवंशी, रामराव पाटील, संतोष गाजेवार, गजानन हरडपकर, गजानन चायल, उदय देशपांडे, हिदायत खान, कैलास राठोड, अनिल भोरे, राम नरवाडे, गोविंद शिंदे, श्याम पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, दिनेश राठोड, विकास नरवाडे, लक्ष्मण डांगे, देवराव वाडेकर, मारोती वाघमारे, आदींसह शिवसैनिक कार्यकर्ते, भाविक भक्त व मंदिराचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
