आरोग्यनांदेड

Awareness Campaign : भोकर येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

विद्यार्थिनींना दिले सविस्तर मार्गदर्शन

भोकर/नांदेड| गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत भोकर येथील मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जागतिक महिला दिनापासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर इयत्ता ८ वी व ९ वी मधील (वय १४ ते १५ वर्षे) मुलींना एचपीव्ही लसीचे महत्त्व, फायदे, तसेच लसीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक माध्यमांवर पसरलेल्या चुकीच्या माहितीबाबतही विद्यार्थिनींना जागरूक करण्यात आले.

हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या नियोजनातून ही मोहीम प्रभावीपणे सुरू आहे.

IMG 20260325 WA0063 Awareness Campaign : भोकर येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यन्नावार, डॉ. वेंकटेश टाकळकर व आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी विद्यार्थिनींना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच पालकांनी आपल्या मुलींना सोबत घेऊन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

IMG 20260325 WA0064 Awareness Campaign : भोकर येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. पाटील, शिक्षकवर्ग तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.  एकूणच, या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!