Awareness Campaign : भोकर येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती
भोकर/नांदेड| गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत भोकर येथील मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जागतिक महिला दिनापासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर इयत्ता ८ वी व ९ वी मधील (वय १४ ते १५ वर्षे) मुलींना एचपीव्ही लसीचे महत्त्व, फायदे, तसेच लसीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक माध्यमांवर पसरलेल्या चुकीच्या माहितीबाबतही विद्यार्थिनींना जागरूक करण्यात आले.
हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णा...

