कुंडलवाडी l गोदातिरचे ज्ञान तपस्वी कै.नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केली असून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ,कुंडलवाडीचे भुमिपूत्र प्रा. डॉ.बालाजी चिरडे यांची या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असतील, तसेच आ. हेमंत पाटील ,आ. बालाजी कल्याणकर ,आ .श्रीजया चव्हाण,आ. राजेश पवार, डॉ. रवींद्र तांबोळी, वास्तुशास्त्रज्ञ अजय कुलकर्णी ,सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश खुरसाळे यांच्यासह प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांचा यात समावेश आहे.


स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी वितरित करून काम करण्यात आले होते मात्र काही कामे निधी अभावी प्रलंबित राहिली त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी 1478 लाखांचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

मार्च 2024 मध्ये या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या समितीकडे स्मारकाच्या कामाचा आढावा घेणे, ते नियोजित वेळेत पूर्णत्वास नेणे, गुणवत्तेची खात्री करणे, मंजूर निधी वेळोवेळी मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा करणे, आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन होत आहे याची खात्री करणे. अशा जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत असून हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. शर्मा यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले. प्रा. चिर



