HomeनांदेडDattatkumar Kalsait ; वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा -...

Dattatkumar Kalsait ; वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत

नांदेड l कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील वैयक्तीक लाभधारकांना प्राधान्याने 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आपली जात प्रमाणपत्र , फार्मर आयडी, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत.

जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या या संधीचा लाभ घेवून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनक्षमता वाढवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments