नवीन नांदेड l विजयादशमी ( दसरा ) निमित्य 2 ऑक्टोबर रोजी आर.एस.एस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर्फे शताब्दी वर्षा निमित्त सिडको स्वामी समर्थ केंद्र ते सिडकोतील मुख्य रस्त्याने आयोजित करण्यात आलेल्या पथसंंचलनाचे सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय देशमुख मित्र मंडळ तर हडको येथे भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.


प्रथमच सिडको भागात राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या वतीने विजया दशमी निमित्ताने पथसंचलन करण्यात आले, यावेळी सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उदय भाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने भाजपा महानगर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे, वाघाळा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख,सतिश बसवदे,राजु लांडगे,मौनु जोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तर ,हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजपा उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली या पंथसचलन मध्ये प्रमुख वक्ते आशिष सिंह चौधरी जिल्हा कार्यवाहक व प्रमुख अतिथी म्हणून वृक्ष मित्र मोहन लालाराव घोगरे यांच्या सह सिडकोतील पदाधिकारी जनार्दन ठाकूर, विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, स्वामी धिरज,सिध्दार्थ धुतराज, यांच्या सह पदाधिकारी सहभागी होते.


सिडको ते हडको व परत पुन्हा मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी नागरीक पदाधिकारी यांनी पुष्पवृष्टी केली, पथसंचलन नेतृत्व तुकाराम बेसते यांनी केले. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे व पोलीस अंमलदारांनी मुख्य मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवुन कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.




