क्राईमनांदेडपरभणी

Police take major action : पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 13 जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी| पाथरी शहरातील जुगार अड्डे व मटका बुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण 13 आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे 1 लाख 49 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी पोलिसांच्या विशेष पथकाने पाथरी शहरातील रशिद कॉलनी परिसरात धाड टाकली. येथे एका शेडमध्ये ‘तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 33,200 रुपयांची रोकड व 7 मोबाईल असा 83,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्यानंतर दुसरी कारवाई नायब हॉटेलजवळील परिसरात करण्यात आली. येथे ‘फन टारगेट चक्री’ (बिंगो) नावाचा ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, 36,600 रुपयांची रोकड, एक मोबाईल व संगणक साहित्य असा 66,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणीही पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2026 03 24 at 17.08.50 1 Police take major action : पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 13 जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही कारवायांमध्ये एकूण 69,800 रुपयांची रोकड, 8 मोबाईल, तसेच संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस कर्मचारीांकडे सोपविण्यात आला आहे. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधात कारवाईसाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी 91 50 100 100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!