Wednesday, May 13

Tag: dens in Pathri; 13 people arrested

Police take major action : पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 13 जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Police take major action : पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 13 जण ताब्यात, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड, परभणी
परभणी| पाथरी शहरातील जुगार अड्डे व मटका बुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण 13 आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे 1 लाख 49 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी पोलिसांच्या विशेष पथकाने पाथरी शहरातील रशिद कॉलनी परिसरात धाड टाकली. येथे एका शेडमध्ये ‘तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 33,200 रुपयांची रोकड व 7 मोबाईल असा 83,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर दुसरी कारवाई नायब हॉटेलजवळील परिसरात करण्यात आली. येथे ‘फन टारगेट चक्री’ (बिंगो) नावाचा ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे उघडकीस आले. या ठिकाण...
error: Content is protected !!