नांदेडराजकीय

Vishnupuri ; विष्णुपुरी येथे अनेक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला – NNL

नवीन नांदेड l नांदेड जिल्हायातील एकमेव महिला पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायत विष्णुपुरी महिला पदाधिकारी सह गावातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मतदान केले.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले, विष्णुपुरी जिल्हा परिषद शाळा येथे 5 मतदान ‌केद्रं असुन या ठिकाणी एकुण 5100 मतदार असुन महिला मतदार संख्या जवळपास दोन हजार आहे.नांदेड जिल्ह्यातील एकमेव महिला पदाधिकारी असलेल्या विष्णुपुरी ग्रामपंचायत येथे 15 सदस्य महिला असुन ग्रामपंचायत सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य‌ यांनी व गावांतील जवळपास दोन हजार महिलांनी जिल्हा परिषद शाळा विष्णुपुरी येथे रांगेत उभे टाकून मतदान केंद्रावर मतदान केले.
अनेक महिलांनी मतदान झाल्यावर सेल्फी पाईंट‌ व्दारे मोबाईल मध्ये फोटो तर एकत्र येऊन अनेक महिलांनी फोटो काढून घेतल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button