नांदेडमनोरंजन

Lanka Dahan : ‘लंका दहन’ नाटकातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

नांदेड| हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपनगरात सादर करण्यात आलेल्या ‘लंका दहन’ नाटकास रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. रामायणातील जिवंत देखाव्याने अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षक भाऊक झाले होते.

नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. अनुराधा पत्की यांनी अत्यंत सुंदर केले होते. दीपनगर हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या या भव्य नाटकास चिन्मय मिशनचे प्रत्ययानंद महाराज, आ.बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी नाथा चितळे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचा तसेच सर्व कलाकारांचा यावेळी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रभू चरणी सेवाभाव वृत्ती ठेवून दिग्दर्शक, सर्व कलाकार यांनी आपली नि:शुल्क सेवा अभिनयाच्या रूपाने अर्पण केली. नाटकासाठी सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता.

नाटकातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्यासह सर्व इतर पात्रातील कलावंतांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः दोन तास खीळून ठेवले होते. नाटकात श्रीराम – विश्वास आंबेकर, सीता – पुनम देशपांडे, लक्ष्मण – आनंद भालेराव, हनुमान- विनायक जकाते बंधू, रावण- गणेश भोरे, बिभीषण – सुमेध पांडे,जटायु व संपाती – प्रल्हाद घोरबांड, सुग्रीव- सुरेश उबाळे जांबवंत- श्रीनिवास गुडसुरकर, शबरी- प्रतिभा पांडे, त्रिजटा- मनीषा पाठक, आदिती देशपांडे, अंगद -युवराज नाईक, वानर सेना -सोपान साळवे, अर्चित धानोरकर, तेजस बनगुलवार, अर्णव उमरजकर, योगिता नरवडे, स्वरीत महाजन आदींनी आपली दमदार भूमिका सादर केली. सूत्रधार- दिपाली चौधरी, नृत्य – दिपाली आवाळे आणि संच तर संगीत संयोजन- वेदांत कोहिरकर,गजानन राजकुंटवार (बासरी) यांनी केले. दीपनगर हनुमान मंदिर समिती, अर्चित पॅथॉलॉजी लॅब यांच्या वतीने भव्य नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी यासाठी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button