police ; ग्रामीण पोलीसांनी चोरी व घरफोडीतील सहा चोरट्यांना मुद्देमालसह केली अटक

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच घटनेतील सहा आरोपींना पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने 3 लाख 85,हजार मुद्देमाल सह अटक केली असून या कामगीरी बदल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सह वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.अटक केलेल्या आरोपी कडुन अन्य चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वरील नमुद गन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 17 मार्च 25 रोजी गोपनीय माहितीचे अधारे वरील नमुद सहा आरोपीतांना ताब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल तपास केला असता आरोपीतांनी 5 ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यावरुन वर नमुद 5 गुन्ह्यातील एकुण 3लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला अधिक तपासासाठी आरोपीतांस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाचा पी.सी.आर मिळाला आहे. गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगौरीचे वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे .

या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बी.ई चव्हाण, पोहेको मोरे, पोहेकों तिडके, पोकॉ भिसे, पोकों कलंदर, पोकॉ शिरगीरे, पोकॉ माळगे, पोकों सिरमलवार यांनी गुन्हा उघडकीस आणला असुन या फिर्यादी बालाजी जाधव ,शेख शादुला, नारायण कापुरे, गंगाधर करंडे, नामदेव हंबर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम गुरनं 264/2025 कलम 303 ,305,331 (4) भान्यसं गुरनं 987/2024 कलम 31(4 305(9) भान्यसं,गुरनं819 /2024 कलम 331(4), 305(9) भान्यसं गुरनं 968/2024 कलम 331(3), 331 (4),305भान्यसं,गुरंन 68/2025 कलम 303 (2 भान्यसं गुन्हा मधील पोलिसांनी पाच किवटंल सोयाबीन अंदाजे किंमत 20,हजार, दोन पाण्याचे मोटार अंदाजे किंमत दहा हजार,एक सबमरशिबल मोटार दहा हजार ,एक दुचाकी नव्वद हजार,एक पल्सर मोटार सायकल 1,25 हजार व एक ॲटो 1,30,हजार असा एकुण 3,लाख 85, हजार मुद्देमाल जप्त केला आहे.

या केलेल्या कार्यवाहीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button