Sunday, May 17

Sangh’s grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहरात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सघोष पथसंचलन शोभायात्रा व शस्त्रपूजन भव्य उत्साहात पार पडली. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी, सडा-सन्मार्जन व रांगोळ्यांद्वारे पथसंचलनाचे स्वागत केले.

IMG20251002093849 Sangh's grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न
oplus_0

558209131 3901285686682211 46439016830512409 n Sangh's grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

“विजयादशमी हा पराक्रम आणि पौरुषत्व जागवणारा सण आहे. प्रभू श्रीरामाचे कोदंड, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, दुर्गामातेचा त्रिशूल आणि छत्रपती शिवरायांची तलवार यांसारख्या शस्त्रांचे पूजन करून संघ समाज संघटित व समरस करण्याचे कार्य करत आहे. संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले असून, शताब्दी वर्षानिमित्त हिमायतनगर शहरात विजयादशमी सोहळ्याची सुरुवात भगव्या ध्वजाला वंदन व प्रार्थनेने झाली.

IMG20251002094055 Sangh's grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न
oplus_0

556236543 3901286300015483 7960890948698925710 n1 Sangh's grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शोभा यात्रा श्री परमेश्वर मंदिरापासून निघालेली पथसंचलन रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून परत मंदिर मंगल कार्यालय येथे समारोपास आली. बौद्धिक मार्गदर्शन सत्रात डॉ. दामोधर राठोड, प्रमुख वक्ते नागेश कल्याणकर आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शस्त्रपूजन व भारतमातेसह डॉ.हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विजयादशमीचे महत्त्व अधोरेखित केले.

IMG20251002094041 Sangh's grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न
oplus_0

या कार्यक्रमात महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित होते. विजयादशमी सोहळ्याने हिमायतनगर शहरात उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली असल्याची माहिती तालुका कार्यवाहक गजानन पांडुरंग जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!