किनवट, परमेश्वर पेशवे। भारत निवडणूक आयोगाने एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादींचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली असून बीएलओ घरोघरी भेटी देऊन पडताळणी व नव मतदारांची नोंदणी करत आहेत तसेच मयत दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदारांचे योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यवयात केले जाणार असुन मतदारांनी याची नोंद घ्यावी व नाव नोंदणी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी केले आहे.
किनवट विधानसभा मतदारसंघ 83 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिशिमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदार संघाच्या रचनेनुसार किनवट मतदार संघात नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो.
भारत निवडणूक आयोगाने एक जुलै 2024 या अहर्ता दिनांक वर आधारित छायाचित्र मतदार यादी चा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार दिनांक 25 जून ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एलओ द्वारे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे यादरम्यान नव मतदारांची नोंदणी व दुबार मयत मतदारांचे नाव वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदारांची योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यावत केले जाणार आहेत तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल तसेच 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत या काळातील शनिवार रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून 20 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे एक जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात अंतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदविता येणार आहे. तरी किनवट विधानसभा 83 मतदारसंघातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी केले आहे.