नांदेड। शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेवरून नांदेडच्या वजीराबाद गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त केले आहे.
याबाबा सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परीसरामध्ये मोबाईल चोरीच्या घडत आहेत त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उप विभाग सहा. पोलीस अधीक्षक किरितिका सी.एम. यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार व त्यांच्या हालाचालींवर लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मोबाईल चोरीचे गुन्हेगारांना अटक करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.
मागील काही दिवसात बसस्थानक व रेल्वेस्टेशन परीसरा मधुन मोबाईल फोन चोरीस / गहाळ होत असल्याबाबतच्या तक्रार येत असल्याने मा. श्री. किरितिका सी.एम. सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग, नांदेड शहर, व परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आर. डी. वटाणे, सपोनि, पोहेकों / दत्तराम जाधव, पोहेकॉ मनोज परदेशी, पोना/शरदचंद्र चावरे, पोकॉ शेख ईम्रान शेख एजाज, पोकों/ बालाजी कदम, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ 14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/329 मेघराज पुरी, हे मोबाईल चोरट्यांचा शोध घेणेकामी अभिलेखवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते.
दिनांक 04.06.2024 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडुन माहीती मिळाली की, चौधरी पेट्रोलपंपाचे बाजुस तारा पान शॉप समोर डोक्याला लांब केस असलेला व शर्टीग केलेला इसम उभा असुन त्याचेकडे बरेच मोबाईल फोन आहेत तो लोंकांना सदरचे मोबाईल फोन विक्री करती आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यामाहीती वरुन वर नमुद पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी जावुन सदर वर्णनाचे ईसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अरुण रामदास श्रीमंगले, वय 36 वर्षे व्यवसाय हेअरकटींग सलुन राहणार जागृत हनुमान मंदीर काबरा नगर नांदेड ता.जि. नांदेड त्याचे थैलीची झडती घेतली असता त्याचे थैली मध्ये एकुण (13) संशईत मोबाईल (चोरीचे/गहाळ) किमंती 1,34,000/- रुपयाचे मिळुन आल्याने सपोनी आर.डी. वटाणे यांनी पोलीस ठाणे वजिराबाद पोलीस एन.सी. क्रमांक 112/2024 कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहे.
सदर इसमाकडे मोबाईलबाबत अधिक विचारपुस करता तो समाधान कारत उत्तरदे देत नसल्या कारणाने व सदर मोबाईल धारकांचे तक्रारी अगर गाहाळ बाबत नोंदी तपासुन पुढील अधिक चौकशी कामी पोहेकॉ/152 मनोज परदेशी यांचे कडे देण्यात आला तसचे चौकशी दरम्यान संबधाने चोरीच अगर गहाळची तक्रार अढळुन आल्यास पुढील कादशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे. गुन्हे शोध पथक वजीराबादचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.