
नांदेड| गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने पतंजली योग परिवार, नांदेड यांच्या वतीने गुरुवार दि. 19 मार्च रोजी भव्य 111 कुंडी संकल्प यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार बालाजीराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


अशोक नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पहाटे 5.30 ते 7.00 या वेळेत नि:शुल्क योग सत्र घेण्यात आले. त्यानंतर सकाळी 7.00 ते 7.30 या वेळेत नारायणराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 111 कुंडी यज्ञ विधी पार पडला.

या प्रसंगी पतंजलीच्या साधकांनी विश्वशांतीची प्रार्थना करत स्वतःसह कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करण्याचा संकल्प केला. पुढे सकाळी 7.30 ते 8.00 दरम्यान गुढी पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांना महाप्रसाद म्हणून पणह व पछडा वितरित करण्यात आला.


कार्यक्रमास शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, राजेंद्र शंकरपुरे, जनार्दन आठवले, हनुमंत ढगे, सुरेश लंगडापुरे, ताराबाई दळवी, निवृत्ती रायमुळे, अंगद शिंदे, शिवानंद स्वामी, भरत टेकाळे, यशोदाबाई शिंदे, विकास बनगिनवार, स्मिता बनगिनवार, दिलीप आघाव, सुनिता आघाव, अवधूत गिरी, भाग्यलक्ष्मी गडप्पा, सविताताई गबाळे, रवींद्र कंधारकर, नामदेवराव मोहिते, चित्रा कंधारकर, शिवकुमार गंजेवार, आदित्य परदेशी, अमर परदेशी, देवेश सलगरकर, श्रीरंग मोरे, किशन इबितोदार, किरण मुत्तेपवार, मुंजाजी जाधव, सुभाष जाधव, व्यंकट कल्याणपाड, प्रतिभाताई पाटील,

पंडित पाटील, शंकर परकंटे, भगवान किडे, के. एस. जाधव, बापूराव मोरे, महादेव महाजन, शोभा कापसे, गंगाधर इंगोले, शैलेंद्र नावडे, शंकर महाजन, सौ. महाजन, व्यंकट कोडगिरे, निर्मलाबाई कोरे, चंदाताई हळदे, सामलेटी नागभूषण, विनोद मालू, मीनाक्षी चिल्लरगे, मंगल पाटील, श्याम मालपाणी, सविता पवार, सुनीता डांगे, शीला येरावार, विष्णु शिंदे, अनिल कदम, संगीता भोंगे, सरोज साटेवार, जानकी कोलंपले, अनिता आठवले, राजू शेटे, सरस्वती कांबळे, मनीषा गोवंदे, केवलाबाई कांबळे, स्वर्ण वाघमारे, अर्जुन रांधड, गोविंद कल्याणपाड, पुंडलिक कोडगिरे, सौ. मोहिते, भगवान देशमुख, छाया देवर, आर. जे. कदम, राठोड सर, दिगंबर वेताळकर, सौ. वेताळकर, राजश्री सावंत, उत्तरा जोशी, शर्मिला लंगडापुरे, जयश्री कल्याणपड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती अनिल अमृतवार यांनी दिली.



