111 Kundi Sankalp Yagya : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पतंजलीतर्फे 111 कुंडी संकल्प यज्ञ संपन्न
नांदेड| गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने पतंजली योग परिवार, नांदेड यांच्या वतीने गुरुवार दि. 19 मार्च रोजी भव्य 111 कुंडी संकल्प यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार बालाजीराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अशोक नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पहाटे 5.30 ते 7.00 या वेळेत नि:शुल्क योग सत्र घेण्यात आले. त्यानंतर सकाळी 7.00 ते 7.30 या वेळेत नारायणराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 111 कुंडी यज्ञ विधी पार पडला.
या प्रसंगी पतंजलीच्या साधकांनी विश्वशांतीची प्रार्थना करत स्वतःसह कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करण्याचा संकल्प केला. पुढे सकाळी 7.30 ते 8.00 दरम्यान गुढी पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांना महाप्रसाद म्हणून पणह व पछडा वितरित करण्यात आला.
कार्यक्रमास शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, राजेंद्र शंकरपुरे, जनार्दन आठवले, हनु...
