
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे “ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य धंदयांची माहिती काढुन कार्यवाही करण्या बाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते.


दि.30/08/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. श्री रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड दिनांक 30/08/2024 रोजी अवैद्य धंदयांची माहिती काढुन केसेस करणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मॅफको रोड राजा पॅलेस फंक्शनहॉल समोर सार्वजनिक रोडवर इतवारा नांदेड येथे एक इसम अॅक्टीव्हा मो.सा. वर गुटखा घेवुन जात आहे.

याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी 17.15 वा. छापा मारला असता तेथे एक इसम अॅक्टीव्हा मो.सा. क्र. एम. एच. 26 सी.बी. 0260 जुनी वापरती किंमती अंदाजे 65000/-रूपये वर स्वतःचे फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा किंमत अंदाजे 21206/- रूपयाचा घेवुन जात असतांना मिळुन आला असा एकुण 86206/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरून पो.स्टे. इतवारा, नांदेड येथे गु.र.नं.328/2024 कलम 123, 274, 275 बी. एन. एस. सन 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. विलास पवार हे करीत आहेत.


सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, उप विभाग इतवारा, नांदेड, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे पो.स्टे. इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे. मा. वरिष्ठ अधिकारी यांनी चांगली कामगीरी केली या साठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




