Friday, May 15

Nanded bandh ; हिंदू बांधवांनी नांदेड बंद मध्ये सहभागी होऊन बंद शांततेत पार पाडावा -डॉ. संतुकराव हंबर्डे – NNL

नांदेड | बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या क्रूर अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे 17 ऑगस्ट रोजी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी सहभागी होऊन बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन भाजपा नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार या विषयावर नुकतीच एका बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज उपस्थित होते व सर्वानुमते दि 17 ऑगस्ट रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व हिंदू समाजाला आवाहन केले आहे की, सर्व सकल हिंदू समाज यांनी आपल्या धर्मासाठी स्वतःहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत.

बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधव, आई, बहिणी, मुलं यांचा किंचितही विचार न करता क्रूरपणे त्यांची भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. हिंदूचे मंदिर उद्ध्वस्त केले जात आहेत. मंदिरातील पुजारींना फाशीवर लटकवण्यात येत आहे. हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे, भारतच नाही तर संपूर्ण जगातील हिंदू समाज खूप आक्रोशात आहे व या घटनेवर दुःख व्यक्त करत आहे असेही हंबर्डे यांनी सांगितले. आपण सर्व हिंदू एकता दाखवून देण्यासाठी नांदेड कडकडीत बंद ठेवावे व हा बंद शांततेत करावा व पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!