नांदेडमहाराष्ट्र

8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात….शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

नांदेड। दि. 08 जुलै रोजी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असुन, सगेसोयरे कायद्याची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी ते पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करून समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत.

6 जुलै पासून हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या *शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅलीला* अनुक्रमे परभणी, नांदेड, लातुर धाराशिव, बीड, जालना आणि शेवट हा छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस अशा हिशोबाने जरांगे पाटील हे त्या त्या जिल्ह्यातील समाज बांधवांशी संवाद करून जर का सरकारने 13 जुलै पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या काळातला मराठा समाजाचा निर्णय हा सरकारला परवडणारा नाही मग तो 288 विधासभेत मराठा उमेदवार उभे करने असेल किंवा मग त्यांचे पाडणे असेल या सर्व विषयावर ते सरकारला चेतावणी आणि समाजासोबत संवाद या दोन गोष्टी साठी ते मराठवाडा दौरा करीत आहेत.

IMG 20240621 WA0008 8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात....शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

सदरील दौऱ्याच्या अनुषंगाने काल दि. 20 जुन रोजी हनुमान मंदिर विजय नगर येथे सकल मराठा समाजाची एक सामूहिक बैठक बोलावन्यात आली होती व त्या बैठकीत सर्वानुमते असे ठरवण्यात आले कि, सदरील रॅलीसाठी कुणीही निधी संकलन न करता एक एक जबाबदारी ही समाजातीलंच दात्यानी वाटून घ्यायची आणि तात्काळ तशा जबाबदाऱ्या घेण्यात सुद्धा आल्या असुन आज पासून गावोगाव व तालुक्यातील सर्वच ठिकाणी जनजागृती करण्यासाठी कॉर्नर बैठका घेऊन 8 तारखेच्या रॅली संदर्भात जनजागरन करण्यात येणार आहे.

सदरील रॅलीला सुरुवात ही व्यंकटराव तरोडेकर चौक (राज कॉर्नर) ते छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा नांदेड इथपर्यंत असेल. बाहेर गावातून येणाऱ्या वाहणाची पार्किंग ची व्यवस्था ही नविन मोंढा मार्केट कमिटी मैदानात करण्यात आली असुन त्याच ठिकाणी भव्य अन्नदान छत्र आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.रॅलीदरम्यान जागोजागी खिचडी व पाणी वाटप करण्यात येणार असुन रात्री मुक्कामाच्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील गावागावातून घरच्या भाकरी-भाजी-ठेचा लोकांनी स्वयंस्फूर्तीने आणुन देण्याचे मान्य केले आहे.

IMG 20240621 WA0007 8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात....शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

सदरील रॅली ला सुरक्षा पुरविण्यासाठी बैठकीत जवळपास 2800 मराठा सेवकांची तजबीज करण्यात आली असुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ एक छोटासा स्टेज व उत्तम कॉलिटीची साउंड सिस्टिम लावण्यात येणार आसून जने करून समाज बांधवाची कितीही प्रचंड गर्दी झाली तरी आवाजाचा अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे याची पूर्णतः काळजी संयोजक मंडळीकडून घेण्यात येत आहे.सदरील मराठा आरक्षण संवाद रॅलीत लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा सकल मराठा समाजाकडून करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!