हिमायतनगर, परमेश्वर काळे| जि.प.कें.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे किरणभाऊ बिच्चेवार यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल 2000 वह्यांचे वाटप (Notebooks/registers distributed to 600 students of Zilla Parishad school) करण्यात आले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे चिमुकले विद्यार्थी आनंदित झाले आहेत.


दिनांक 4 जुलै 2025 रोजी जि.प.के.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे स्व. लवचंदभाई त्रिभुवनदास व्होरा यांच्या स्मरणार्थ व्होरा कुटुंब, महावीर राहत केंद्र घाटकोपर (पूर्व) मुंबई आणि जिल्हा परिषद कन्या शाळेचे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बिच्चेवार यांच्या पुढाकाराने शाळेतील एकुण 600 विद्यार्थ्यांना 2000 वह्या/रजिस्टर वाटप करण्यात आले. यावेळेस शाळेचे विद्यमान अध्यक्ष गणेश पाळजकर, सदस्य किरण माने, रामराव सूर्यवंशी, ठाकरे काका, आशिष जैन, मिरजगावे सर, होळकर, दळवी त्याचबरोबर बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

किरण बिच्चेवार म्हणाले की,शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी या वह्या/रजिस्टर वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. कन्या शाळा ही आपले एक कुटुंब आहे. शाळेतील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. “शाळेला मदत करण्यासाठी सर्वांनी शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व शाळेच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी मदत करावी. लोकसहभाग वाढवावा, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी शाळेला सर्वांनी सहकार्य करावे” असे आव्हान त्यांनी केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजयजी चोले, संभाजी कदम सर,आर.सी.चव्हाण सर, पैलवाड सर, नाथा गंगुलवार सर, सचिन जाधव सर, मुल्ला सर, साताळे सर, बनसोडे सर, भिमराव हनवते सर, संतोष पोकलेवाड सर, शाकेर सर, आशपाक खान सर, आला सर, कैलास जाधव सर, गौतम हनवते सर, प्रशांत जाधव सर, प्रदिप नरारे सर, श्रीमती कन्नावार मॅडम, श्रीमती रामदिनवार मॅडम, श्रीमती नसरीन फातेमा मॅडम, श्रीमती काकडे मॅडम, कु.भक्ती पिटलेवाड मॅडम आदींसह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.चव्हाण यांनी केले.
