नांदेड| चविसाव्या अमरनाथ यात्रेसाठी नांदेड येथून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पहिल्या जथ्थ्यातील 93 यात्रेकरूंना नवी दिल्ली स्टेशनवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यातर्फे स्वादिष्ट गरमागरम महारास्ट्रीयन भोजनाची व्यवस्था करण्यात आली.


भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी खा. चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील भाविक अमरनाथ यात्रेला जात असल्याची माहिती दिली. खा.चव्हाण यांनी दिल्ली येथील आपले स्वीय सहाय्यक सुरेश भोसीकर यांना सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच प्रवासात कोणती अडचण येऊ नये यासाठी खा. चव्हाण यांनी दोन शिफारस पत्रे दिली.त्यानुसार भोसीकर यांनी शनिवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास नवी दिल्ली स्टेशनवर स्वादिष्ट महारास्ट्रीयन भोजनाचे पार्सल आणून दिले. यावेळी अमरनाथ यात्री संघातर्फे स्मृतिचिन्ह व शिरोपाव देऊन सन्मान करण्यात आला.


वेगवेगळ्या डब्यामध्ये बसलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना जेवणाचे डबे वाटप करण्याचे काम विशाल पवार, शैलेंद्र वडस्कर, अच्युत जोशी, जयंतीलाल पटेल, साईनाथ कासटवार, व्यंकटेश जामकर, राजेश सटलावार, माधव बामणे, सुभाष देवकते, सुरेश शर्मा, जयप्रकाश येवले, नरेंद्र जोशी, रामेश्वर वाघमारे, नारायण पांडे,राजेशसिंह ठाकूर यांनी व्यवस्थित पार पाडले. रेल्वे प्रवासादरम्यान स्वादिष्ट गरमागरम भोजन मिळाल्यामुळे सर्व यात्रेकरूंनी खा. चव्हाण यांचे आभार मानले.
