Thursday, May 14

Tag: Maharashtrian food arranged

Food Arranged : अमरनाथ यात्रेकरूंची खा. अशोकराव चव्हाण यांच्यातर्फे महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था

Food Arranged : अमरनाथ यात्रेकरूंची खा. अशोकराव चव्हाण यांच्यातर्फे महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| चविसाव्या अमरनाथ यात्रेसाठी नांदेड येथून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पहिल्या जथ्थ्यातील 93 यात्रेकरूंना नवी दिल्ली स्टेशनवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यातर्फे स्वादिष्ट गरमागरम महारास्ट्रीयन भोजनाची व्यवस्था करण्यात आली. भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी खा. चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील भाविक अमरनाथ यात्रेला जात असल्याची माहिती दिली. खा.चव्हाण यांनी दिल्ली येथील आपले स्वीय सहाय्यक सुरेश भोसीकर यांना सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रवासात कोणती अडचण येऊ नये यासाठी खा. चव्हाण यांनी दोन शिफारस पत्रे दिली.त्यानुसार भोसीकर यांनी शनिवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास नवी दिल्ली स्टेशनवर स्वादिष्ट महारास्ट्रीयन भोजनाचे पार्सल आणून दिले. यावेळी अमरनाथ यात्री संघातर्फे स्मृतिचिन्ह व शिरोपाव देऊन सन्मान करण्यात आला. ...
error: Content is protected !!