नवीन नांदेड l श्रीदत्त कृपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाघाळा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नववधू वर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षदिन साजरा करण्यात आला.


दरवर्षी प्रमाणे याही 13 व्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त5 जूंन रोजी हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय परिसरातील प्रांगणात वृक्ष मित्र मोहन पाटील घोगरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी वृक्षाच्या वाढदिवस व आकरा वृक्षलागवड नववर गणेश घोगरे व वधू स्वाती शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माधव घोगरे,दिगांबर घोगरे चेअरमन,मधुकर घोगरे, त्र्यंबक कदम, काळबा घोगरे, संजय बनसोडे, संतोष घोगरे,माधव घोगरे, स्वप्नील,अत्ररीनंदन घोगरे, यांच्या सह वधुवर यांच्या कडील नातेवाईक व पाहुणे मंडळी उपस्थित होती.

गेल्या तेरा वर्षात जवळपास आठ हजार पाच वृक्षे सिडको हडको वाघाळा शाहू नगर परिसरात दुतर्फा स्वखर्चाने वृक्ष मित्र मोहन पाटील घोगरे यांनी विविध जातींचे अनेक वृक्ष लागवड करून जोपासली आहेत, दररोज वृक्षांना पाणी टाकणे जोपासणे यासाठी टॅकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.अनेक वृक्ष दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष डोलु लागली आहेत.
