नविन नांदेड l नांदेड तालुक्यातील काकांडी या गावी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, उपस्थित समाज बांधवांनी यळकोट यळकोट जय मल्हार घोषणा दिल्या.


दि ७ जून रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त काकांडी येथिल मूख्य रोड बसस्टँड ते खंडोबा मंदीर पर्यंत ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढुन खंडोबा मंदीर येथे काढण्यात आली.

यावेळी कार्यक्रामाचे उध्दघाटक माजी जिप सदस्य गंगाप्रसाद काकडे ,माजी जिप सदस्य मनोहर पाटील शिंदे ,माजी सभापती बबनराव वाघमारे , शिवसेना महाराष्ट् राज्य ओबीसी नेते अनिल पाटील धमने,माजी पोलीस पाटील चांद पाशा ,देवराव काकडे,शिवसेनेचे विजय पांचाळ यांच्या सह प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन करून अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन क करण्यात आले . या वेळी गंगाप्रसाद काकडे बबनराव वाघमारे मनोहर पाटील शिंदे अनिल पाटील धमने आदी मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवनावर आपले मनोगत पर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे याच्या सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले तर या कार्यक्रमाचे आयोजक जयमल्हार संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार,जयंती मंडळाचे अध्यक्ष नागनाथ पवार ,अशोक पवार . ज्ञानेश्वर पवार , मोतीराम काळे . नारायण माली पाटील रुद्राजी पातळे . व्यंकटी पवार ,ज्ञानेश्वर साखरे . पांडुरंग वैदे ,दत्ता पवार ,भागवत पवार नारायण पवार ,विनायक पवार . जळबाजी पवार ,सौरव पवार ,हरी पवार ,पिंटू पवार ,एकनाथ पवार . बबन पवार ,बाळु पवार ,नंदु पवार . सुरज पातळे , यांच्या सह काकांडी जयंती मंडळाचे पदधकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. जयंती निमित्ताने यळकोट यळकोट जय मल्हार, अहिल्यादेवी होळकरांचा विजय असे आशा घोषणांनी परिसर गजबजून गेला होता.
