नांदेडराजकीय

Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर-पालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या पदांसाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी ११ वाजता झालेल्या या निवडणुकीत भाजपचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड करण्यात आली.

FB IMG 1774359267445 Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

या निवडणूक प्रक्रियेला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते, तर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचीही उपस्थिती होती.

निवडणुकीदरम्यान स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

FB IMG 1774359277477 Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

शहर विकास, महिला व बालकल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तत्पर निर्णय घेण्यासाठी या समित्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. एकूणच, या निवडीमुळे नांदेड महानगरपालिकेच्या प्रशासनाला बळकटी मिळणार असल्याचे चित्र आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!