Wednesday, May 13

Tag: at Nanded Municipal Corporation

Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर-पालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या पदांसाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी ११ वाजता झालेल्या या निवडणुकीत भाजपचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते, तर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचीही उपस्थिती होती. निवडणुकीदरम्यान स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
error: Content is protected !!