


केवळ उड्डाण पुलाचे काम झाले नसल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने हजार मीटर पर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, पावसाळ्यात चिखल आणि आता उन्हाळ्यात धुळीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन आगामी उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा आणि लवकरात लवकर येथील मंजूर उड्डाण पुलाचे काम करून रेल्वे जाईपर्यंत जनतेला ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली जाते आहे.

