नांदेड l दिनांक 13 जुलै 2025 नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला उभारणी आणि संवर्धन मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने “नंदगिरी किल्याचे किल्लेदार” या नावाने ओळख दिली जाणारी स्मृतीपाटी नुकतीच अनावरण करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.


नंदगिरी किल्ला महाराष्ट्रात दोन ठिकाणी प्रसिद्ध आहे—नांदेड आणि सातारा (कल्याणगड). नांदेड येथील नंदगिरी किल्ला हा भुईकोट प्रकारातील असून त्याचा इतिहास सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, बहामनी, मुघल, निजाम आणि शिवकालापर्यंत (इ.स. १६७३) व नंतर ब्रिटिश (१८१८) पर्यंत पोहोचतो. किल्ल्याची दुहेरी तटबंदी, सुरक्षात्मक बुरुज, लोखंडी दरवाजा, व १५x१२x१० फूट आकाराची पुष्करणी या गोष्टींचे विशेष महत्त्व आहे.


गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक रविवारी स्वयंसेवक आणि इतिहासप्रेमी युवक किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्र येत आहेत. झाडेझुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर शस्त्रप्रदर्शन, सेल्फी पॉइंट, इतिहास प्रदर्शन, मार्गदर्शने आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमाला शाळा, पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला.


या मोहिमेच्या यशामागे सर सेनापती पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह, राजेश डाकेवाड, जयेश भरणे, प्रदीप टाक, ओम कदम, अर्जुन नागेश्वर, सचिन तेलंगे, अमोल वागतकर, साई कदम, शिवाजी शिंदे, अक्षय डाकोरे, प्रसाद पवार, रोहित उगीरवाले, सत्यवृत सुरावार, ऋतिक नरडे, पियुषसिंह चौधरी, टोहित ढगे, कृष्णा स्वामी, बाजीप्रताप मोरे, विशाल मोरे, युवराज मुरकुटे, नारायण यमुवार, गोविंद बोंबिलवार, आदित्य नागेश्वर, नारायण जाधव, श्रीकांत शिंदे, श्रीनिवास वाघ, राजेश इतबारे, आकाश वाघमारे, तेजस टोडके, गजानन डोके, सागर ढालकर, विनय मंतुरी, प्रसाद तेलंग यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.

“नंदगिरी किल्याचे किल्लेदार” ही ओळख देणाऱ्या नामफलकाचे नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय श्री. राहुल कर्डिले (भा.प्र.से.) , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव आणि उपायुक्त (GST) श्री. निलेश शेवाळकर यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी तोफेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले आणि गोळा प्रदर्शन सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वयंसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
ही मोहीम म्हणजे केवळ इतिहास जपण्याची नव्हे, तर सामूहिक जिद्द, आत्मीयता आणि संस्कारांची साक्ष ठरली आहे.


