Nandgiri Fort ; नंदगिरी किल्ला मोहीमेला दोन वर्षे पूर्ण; “नंदगिरी किल्याचे किल्लेदार” नाम फलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न
नांदेड l दिनांक 13 जुलै 2025 नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला उभारणी आणि संवर्धन मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने “नंदगिरी किल्याचे किल्लेदार” या नावाने ओळख दिली जाणारी स्मृतीपाटी नुकतीच अनावरण करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
नंदगिरी किल्ला महाराष्ट्रात दोन ठिकाणी प्रसिद्ध आहे—नांदेड आणि सातारा (कल्याणगड). नांदेड येथील नंदगिरी किल्ला हा भुईकोट प्रकारातील असून त्याचा इतिहास सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, बहामनी, मुघल, निजाम आणि शिवकालापर्यंत (इ.स. १६७३) व नंतर ब्रिटिश (१८१८) पर्यंत पोहोचतो. किल्ल्याची दुहेरी तटबंदी, सुरक्षात्मक बुरुज, लोखंडी दरवाजा, व १५x१२x१० फूट आकाराची पुष्करणी या गोष्टींचे विशेष महत्त्व आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक रविवारी स्वयंसेवक आणि इतिहासप्रेमी युवक किल्ल्याच्या पुनरुज्जीवनास...
