Training on child sexual abuse prevention : बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध, उपाययोजनेवर प्रशिक्षण -NNL

नांदेड| जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड व अर्पण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल विसावा येथे ‘बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध व उपाययोजना’ या विषयावर आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन श्रीमती रूपाली रंगारी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणास बालकांच्या विविध विषयांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारीवर्ग, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये बालकांसोबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, बालके अनुचित, अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहेत हे कसे ओळखावे, त्यांच्यावर होणारा अन्यायाला वेळीच पायबंद कसा घालावा, बालकांचे व पालकांचे समुपदेशन कशापद्धतीने करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

अधिकारी, कर्मचारी वर्गाची संवेदनशीलता, ज्ञान, कौशल्य वृद्धिंगत करणे व बालकांशी संबंधित विषय कौशल्याने हाताळणे व बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व यंत्रणेने सतर्क राहावे या हेतूने महिला व बालविकास विभागाकडून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button