Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

Vasantrao Naik College नवीन नांदेड l मातीत राबणाऱ्या माणसांसाठी काम करणाऱ्या दृष्ट्या राजकारण्यांमध्ये वसंतराव नाईक यांचे नाव अग्रभागी आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. नागराज मगरे यांनी केले. येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती आणि कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागराज मगरे यांची उपस्थिती यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. मगरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर भाष्य केले. ‘वसंतराव नाईक यांची राजकीय दृष्टी’ या विषयाच्या अनुशंगाने विचार व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.नागराज मगरे पुढे म्हणाले,दिवंगत वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजना,कृषीविकास,औद्योगीकी करण,भटक्याविमुक्तांसाठी निवासी आश्रमशाळा, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कृषीविद्यापीठांची स्थापना, वीजनिर्मिती प्रकल्पांना मंजुरी यासारख्या अनेक विकासात्मक धोरणांना त्यांनी गती दिली,असेही त्यांनी मत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर एस.बी. आय.बँकेचे सुरज यामिया, व्यंकट सत्यसाई नागेश्वरराव, प्रदीप सहारे, रजतकुमार, सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल सांस्कृतिक विभाग प्रमुख विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. साहेबराव शिंदे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रो. डॉ. रेणुका मोरे, प्रो.डॉ.नागेश कांबळे, प्रा. डॉ.आर.एम. कागणे, डॉ. अनिल गच्चे, डॉ. दिलिप पालिमकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. गणेश लिंगमपल्ले, डॉ.संजय गिरे, आर. डी.राठोड, डॉ. उत्तम कानवटे, डॉ.साहेबराव मोरे, डॉ.विजयकुमार मोरे, प्रा.किशोर सुर्यवाड, प्रा.कविता हंबर्डे, पर्यवेक्षक प्रा.पी.बी.चव्हाण, प्रा.जायदे,प्रा.नंदिनी सुधळकर, प्रा.माधव मुस्तापुरे, प्रा.शेख,प्रा. कोतवाल, प्रा.कपील हिंगोले,प्रा. शशीकांत हाटकर, डॉ. लालबा खरात, डॉ.शोभा वाळुक्कर, डॉ.ललिता आय्या, प्रा.नितीन मुंडलोड,प्रा.भुमरे, डॉ.सरोदे, प्रा.राहुल पडोळे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button