मुक्रमाबाद l मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.


सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. विलास पवार उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.एस.एल. सकणुरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन व कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.यावेळी प्रा.डॉ.दिलीप काळे, प्राचार्य मुकुंदराव जाधव, प्रा.डॉ.आर.बी.मादळे,श्री.चंदू पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मा.म.गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ.आर.बी. बाविस्कर यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
