Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन
Vasantrao Naik College नवीन नांदेड l मातीत राबणाऱ्या माणसांसाठी काम करणाऱ्या दृष्ट्या राजकारण्यांमध्ये वसंतराव नाईक यांचे नाव अग्रभागी आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. नागराज मगरे यांनी केले. येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती आणि कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागराज मगरे यांची उपस्थिती यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. मगरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर भाष्य केले. 'वसंतराव नाईक यांची राजकीय दृष्टी' या वि...
