नांदेड| नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या सब ज्युनियर राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये असर्जन येथील नागेश नारायण लुटे पाटील याने सुवर्णपदक मिळवले असून राष्ट्रीय स्तरावर त्याची निवड झाली आहे.\
राष्ट्रीय निवड चाचणी अंतर्गत पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे दि. ७ जानेवारी रोजी ५१ व्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेचे तसेच राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत असर्जन येथील पैलवान नागेश नारायण पाटील लुटे याने सुवर्णपदक मिळवले आहे.
त्यास नांदेड जिल्हा जुदा असोसिएशन असोसिएशनचे सचिव प्रवीणकुमार कुट्टीकर, उपाध्यक्ष रविकुमार बकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, क्रीडा अधिकारी संजय बेतिवार, बालाजी शिरसिकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक मिळवल्याबद्दल विठ्ठलराव पुयड, जगतसिंग गाडीवाले, दिलीपसिंग गाडीवाले, रविकिरण डोईफोडे, प्रल्हादराव पुयड, जगन्नाथ टरके, गोपीचंद लुटे, अमोल कंकाळ, बारी वस्ताद आदींनी नागेश लुटे याचे अभिनंदन केले आहे.