नांदेड| जिल्ह्यातील मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून 89 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात घरफोशी करणाऱ्या चोरट्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधीकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सपोनि भालचंद्र पदमाकर तिडके, व पोलीस अंमलदार मुक्रामाबाद हद्दीत रात्रगस्त करीत असतांना व (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौ. हंगरगा फाटा येथे तीन संशयीत इसम घरफोडी सारखे गुन्हे करण्याचे उद्देशाने संशयीत रीत्या फिरत असल्याचे समजले.


सदर ठिकाणी तात्काळ जावुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अनिल रमेश कांबळे, वय 26 वर्षे, रा. ठाणा कृष्णुर कर्नाटक राज्य, ह. मु. मुखेड 2) रमेश पोचीराम कडमिचवार, वय 34 वर्ष रा. संतगाडगे बाबानगर, मुखेड 3) राहुल शंकर कांबळे, वय 24 वर्षे, रा. कृष्णुर ह. मु. भवानी मंदीर मुखेड असे सांगीतले. परतु त्यांनी चौकशी दरम्यान गुन्हयासंबधाने समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे त्यांना अटक करून पीसीआर घेवुन चौकशी केली असता त्यांनी पोस्टे मुक्रामाबाद गुरन 196/2024 कलम 305, 331(4), 307, 3(5) भा.न्या.सं-2023 सह कलम 4/25 भाहका प्रमाणे गुन्हाचे कबुली दिली.


त्यांनी सदर गुन्हयातील नगदी 6,300/-रू व एक खंजीर, लोखंडी रॉड, पक्कड इत्यादी साहित्य काढुन दिल्याने ते जप्त केले आहे. व गुरन 16/2024 कलम 457, 380 भादवि हा गुन्हा केला असुन सदर गुन्हयातील जि.प. शाळा मुक्रामाबाद येथील 42 इंची टीव्ही किंमती 33,630/- रू ची जप्त करण्यात आली आहे. तसेच गुरन 168/2024 कलम 305,2024 कलम 305,331 (3) भा. न्या. सं-2023 चा गुन्हा केला असुन सदर गुन्हयातील एक बजाज पल्सर कंपणीची मोटार सायकल किंमती 50,000/- रू ची जप्त करण्यात आली आहे. असा एकुण 89,930/-रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भालचंद्र तिडके, पोउपनि अमर केंद्रे, सय्यद चाँद, सपोउपनि शेख ताहेर, पोहेकों आडेकर, पोकॉ लुंगारे, ढगे व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


