नांदेड| जिल्ह्यातील नायगाव पोलीसांनी तालुक्यातील मौजे मांजरम येथील मंदीरातील दानपेटी फोडून चोरी झालेल्या गुन्हयातील ०३ आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून एकुण १५ हजर ३५० रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल धार्मिक स्थळावर आस्था ठेवणाऱ्या नागरीकातून पोलिसांच्या तत्परतेबद्दल अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंर्तगत सर्व प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या मागील सर्व गुन्हे उघडकीस आणून जनतेमध्ये विश्वासहर्ता प्रस्थापित करण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार दि.०९/०९/२०२४ चे रात्री ०९.०० वाजता ते दि.१०/०९/२०२४ चे सकाळी ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोड्डुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोरुन नेले होते. सदर प्रकरणी सुभाष हावगीरराव मंगनाळे वय ५८ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन नायगाव येथे गु.र.न.२२८/२०२४ कलम ३०५ भा. न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नायगाव यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश अमृता पंडीत हे करीत होते.
दि.१२/०९/२०२४ रोजी तपास पथकातील पोउपनि प्रकाश पंडीत व पोकॉ/३१२ बालाजी शिंदे यांना गुप्त् बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरलेले आरोपी मांजरम येथील असुन सध्या मांजरम येथे असल्याची माहीती मिळाली. सदर बाबत वरीष्ठांना माहीती देवुन मांजरम येथून आरोपी १) बाजीराव गोविंदराव शिंदे वय ३२ वर्षे रा. मांजरम यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवुन मांजरम येथील महादेव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार २) गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव ३) शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे रा. मांजरम ता. नायगाव यांचे सह मिळून केल्याचे कबुल केले.
त्यावरून पोलिसांनी मांजरम येथुन आरोपी क्रमांक २) गोविंद विठल शिंदे वय ३६ वर्षे आणि आरोपी क्रमांक ३) शरद धनराज शिंदे वय २२ वर्षे दोघे रा. मांजरम ता. नायगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्याने गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर तीन आरोपीचे ताब्यातुन १२६० रुपये किंमतीचे चांदीचे दागीने व १४०९० /- रुपये रोख रक्क्म असा एकुण १५,३५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हयात जप्त करण्यात आले आहे. त्या आरोपीतांना मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना एम. सी.आर.केले आहे.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांचे मार्गदर्शनाखाली अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, प्रकाश पंडीत, पोलीस उप निरीक्षक, भिमराव कदम, पोलीस उप निरीक्षक पोहेकॉ/११३३ गणपत पेदे, पोहेकॉ / ९४१ बाबूराव चरकुलवार, पोहेकॉ/३४९ साईनाथ सांगवीकर, पोकॉ/३१२ बालाजी शिंदे, पोकों/ ८४२बालाजी बामणे यांचे पथकाने केली आहे. सर्व पथकांची मा. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.