Naigaon police arrested three accused : दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीतांना नायगाव पोलीसांनी केली अटक; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी -NNL
नांदेड| जिल्ह्यातील नायगाव पोलीसांनी तालुक्यातील मौजे मांजरम येथील मंदीरातील दानपेटी फोडून चोरी झालेल्या गुन्हयातील ०३ आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून एकुण १५ हजर ३५० रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल धार्मिक स्थळावर आस्था ठेवणाऱ्या नागरीकातून पोलिसांच्या तत्परतेबद्दल अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंर्तगत सर्व प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या मागील सर्व गुन्हे उघडकीस आणून जनतेमध्ये विश्वासहर्ता प्रस्थापित करण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार दि.०९/०९/२०२४ चे रात्री ०९.०० वाजता ते दि.१०/०९/२०२४ चे सकाळी ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोड्डुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोर...
