हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे माजाची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी आपल्या सौभाग्यवती सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे यांची कामारी पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे.


अलीकडेच पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण जाहीर झाले असून, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जाती महिला हा प्रवर्ग निश्चित झाला आहे. त्यामुळे कामारी या एकमेव आरक्षित पं.स. गणात नवीन व जुन्या इच्छुकांची चुरस वाढण्याची शक्यता असून, सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे यांची दावेदारी लक्षवेधक बनली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या गणात त्यांच्या दावेदारीला उचीत पाठिंबा मिळत आहे.

त्रिरत्नकुमार भवरे हे माजी आमदार स्व. निवृत्तीराव पाटील जवळगांवकर, स्व. पंजाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई पाटील आणि आमदार माधवराव पाटील जवळगांवकर या परिवाराशी अनेक वर्षांपासून घट्ट संबंध राखत आले आहेत. पक्षनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत.


पत्रकार, संपादक, शाहीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, लोककलावंतांचे मेळावे व बौद्ध धम्म परिषदांचे आयोजक म्हणून त्यांचे कार्य गाजले आहे. वडील गुरुवर्य एम.पी. भवरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक गावांमध्ये विहार व धार्मिक स्थळांना त्यांनी गुप्तरित्या सामाजिक मदत केली आहे. यापूर्वीच्या आरक्षित निवडणुकांमध्ये स्वतः इच्छुक असूनही पक्ष निर्णयाला मान देत त्यांनी अन्य उमेदवारांसाठी काम केले. त्यामुळे यावेळी त्यांचा जनाधार आणि पक्षनिष्ठा पाहता सौ. उज्वला भवरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.

तसेच या गणातून निवडणूक लढविण्यासाठी वंदना पोपलवार, माया गाडगे, ज्योत्सना नरवाडे, या सुद्धा इच्छुक असून, काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता गृहित धरून, काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी आगामी निवडणुकीसाठी जनमत घेऊन उमेदवार निवडला जाईल असे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे जन्मात चाचणीतून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरले हे मात्र साध्यतरी सांगणे कठीण आहे.

