हिमायतनगर, असद मौलाना| येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आज रुग्नालयातील कारभार महिलांच्या हाती होता.


यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विकास वानखेडे यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ना महिला व स्टाफ मधील महिलाणा गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत निरोगी राहणे महत्वाचे आहे.

यावेळी नर्स सौ.मेश्राम, कविता नागमोड, जयश्री सिस्टर, औषध निर्माता दर्शनवाड, NCDसमुपदेशक दीपक इंगोले, समुपदेशक पंडित साबळे, मामीडवार व रुग्ण महिला व आरॊग्य कर्मचारी उपस्थित होत्या.
