नांदेड| प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान त्यांची तब्येत लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या वतीने, शहरातील बर्फी चौक येथील दर्गाह शरीफ हजरत यतीम शाह वली खादरी येथे चादर उडवून दुवा करण्यासह हडको येथील श्री दत्तमंदिर येथे बुधवार (ता.१४) रोजी विशेष पुजा आराधना करण्यात आली.



मतदारसंघातील सततच्या कार्यमग्नतेमुळे खा. वसंतराव चव्हाण यांची मंगळवार (ता.१३) रोजी अचानक तब्येत बिघडली होती, यानंतर पुढील उपचारासाठी, त्यांना हैदराबाद येथे नेण्यात आले. दरम्यान खा. वसंतराव चव्हाण यांच्या उत्तम प्रकृतीसह दीर्घायुष्यासाठी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या वतीने, शहरातील बर्फी चौक येथील दर्गाह शरीफ हजरत यतीम शाह वली खादरी येथे चादर उडवून दुवा करण्यात आली.


तसेच हडको येथील श्री दत्तमंदिर येथे देखील भाविक भक्तांच्या उपस्थितीत विशेष पुजा आराधना करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते बापूसाहेब पाटील, माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे, भी.ना. गायकवाड, लतीफ पठाण, संतोष कराळे, शेख कलिम, अँड. शिवाजी सर्जे, एसपी कुंभारे, आदीसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक आदीसह इतरजण उपस्थित होते.




