नविन नांदेड l जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ‘आऊट लुक’ या मॅगझीनने महाराष्ट्रातील ‘बेस्ट डॉक्टर्स’ ची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये नांदेडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांना पन्नासावे मानांकन प्राप्त झाले, ही अभिमानास्पद बाब नांदेडच्या वैभवात भर घालणारी आहे असे प्रतिपादन कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी केले.

येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. प्रदीप जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून डॉ. नानासाहेब बोलत होते. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शांतादेवी जाधव,कोषाध्यक्ष ॲड. प्रा श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, प्राचार्य डॉ.वसीयोद्दीन मुजावर,प्राचार्य डॉ.सुरेश घुले यांची यावेळी उपस्थिती होती. आफ्रिका खंडातल्या मालावी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ.प्रदीप नानासाहेब जाधव यांच्या उल्लेखनीय योगदान दिले.

आंतरराष्ट्रीय शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप जाधव यांनी मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरातील प्रसिद्ध एल. एम. जे. हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात पोट विकाराच्या विविध १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केली. डॉ. प्रदीप जाधव हे पुण्यातील रेझूलेट केअर, मणिपाल हॉस्पिटल (खराडी पुणे), नोबल हॉस्पिटल (हडपसर) आणि मेडिकेअर हॉस्पिटल (हडपसर) येथे रुग्णसेवेत कार्यरत आहेत.

आफ्रिका खंडातील मालवी या देशात ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरात गेल्या ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या,शस्त्रक्रिया संदर्भातील तंत्रज्ञानाच्या आदान -प्रदानाअंतर्गत आफ्रिकेत कार्डिओलॉजी आणि जनरल सर्जरीसाठी कॅम्पेन राबवण्यात आले. एल. एम. जी. या १०० खाटांच्या रुग्णालयात जनरल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपीच्या रुग्णांवर त्यांनी यावेळी शस्त्रक्रिया केली.

एकूण सात दिवसांच्या या दौऱ्यात २३२ रुग्णांची यावेळी ओपीडी करण्यात आली. त्यात हर्निया, पाइल्स, अपेंडिक्स आणि इतर पोट विकारांची शर्यचिकित्सा करण्यात आली. मालवी शहरातल्या स्थानिक रुग्णांसाठी हे आरोग्य शिबीर राबविण्यात आले. पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शल्यचिकित्से संदर्भातील तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या यशाबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ.प्रदिप जाधव यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ साहेबराव शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.