International surgeon ; जागतिक स्तरावरच्या ‘आऊट लूक’ मॅगझिन मध्ये महाराष्ट्रातून ५० वे मानांकन प्राप्त
नविन नांदेड l जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या 'आऊट लुक' या मॅगझीनने महाराष्ट्रातील 'बेस्ट डॉक्टर्स' ची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये नांदेडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांना पन्नासावे मानांकन प्राप्त झाले, ही अभिमानास्पद बाब नांदेडच्या वैभवात भर घालणारी आहे असे प्रतिपादन कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी केले.
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. प्रदीप जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून डॉ. नानासाहेब बोलत होते. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शांतादेवी जाधव,कोषाध्यक्ष ॲड. प्रा श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, प्राचार्य डॉ.वसीयोद्दीन मुजावर,प्राचार्य डॉ.सुरेश घुले यांची यावेळी उपस्थिती होती. आफ्रिका खंडातल्या मालावी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ.प्रदीप नानासाहेब जाधव यांच्...
