HomeनांदेडSaptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात...

Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL

नांदेड| सप्तरंग सेवाभावी संस्था, लयस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ,जिल्हा प्रशासन नांदेड ,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्च्या उपस्थितीमध्ये उदघाट्न झाले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे कक्षाधिकारी मा. श्री प्रदीप जेठवा, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सान्वी जेठवाणी व आजच्या स्पर्धेचे माननीय परीक्षक श्रीमती तमन्ना नायर श्री ऋषिकेश पोहनकर व श्री कुशल भट्टाचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

पुढील दोन दिवस देखील दोन रंगमंचांवर दिवसभर हा भव्य महोत्सव सादर होणार आहे. या रंगमंचांना पंडित बिरजू महाराज रंगमंच व छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावरती पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील कन्याकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवला तर दुसऱ्या रांगमांच्यावर शास्त्रीय, उपशास्त्रीय लोकनृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळच्या सत्राचे उद्घाटन माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. सायंकाळी सत्रात महाराष्ट्राची लोककला असण्याऱ्या लावणी महोत्सवाने प्रेक्षकांची मने जिंकली. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या दिग्गज लोकांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या नांदेडच्या इंस्टाग्राम इन्फ्लुएजरचा देखील या कार्यक्रमांमध्ये सत्कार केला गेला.

IMG 20240815 163511 Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL

गेल्या अनेक वर्षापासून नांदेड शहरांमध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव एक राष्ट्रीय मंच म्हणून उदयास आला आहे. या महोत्सवामध्ये तीन दिवस सकाळी दहा ते रात्री 10 पर्यंत भरगच्च स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ सान्वी जेठवाणी; सहसंयोजक श्री शुभम बीरकुरे, श्री अक्षय कदम, समन्वयक श्री अब्दुल नइम खान, श्री गणेश चांदोळकर, श्री राजीव जैन, दाईम कुरेशी व असंख्य लोकांच्या अथक परिश्रमामधून कार्यक्रमाला मूर्त रूप प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अश्विनी चौधरी व श्री दरक यांनी लिलया पार पाडले. पुढील दोन दिवस देखील दिवसभर स्पर्धा व सायंकाळी सादर होणाऱ्या लावणी महोत्सवाचा सर्व नांदेडकरांनी पुरेपूर आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments