Saptarang Cultural Festival : सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात झाले उदघाट्न -NNL
नांदेड| सप्तरंग सेवाभावी संस्था, लयस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ,जिल्हा प्रशासन नांदेड ,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 चे मान्यवरांच्च्या उपस्थितीमध्ये उदघाट्न झाले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे कक्षाधिकारी मा. श्री प्रदीप जेठवा, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सान्वी जेठवाणी व आजच्या स्पर्धेचे माननीय परीक्षक श्रीमती तमन्ना नायर श्री ऋषिकेश पोहनकर व श्री कुशल भट्टाचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे उद्घाटन करण्यात आले.
पुढील दोन दिवस देखील दोन रंगमंचांवर दिवसभर हा भव्य महोत्सव सादर होणार आहे. या रंगमंचांना पंडित बिरजू महाराज रंगमंच व छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावरती पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील कन्याकोपऱ्यात...
