नांदेड| हजुर साहिब नांदेड येथून ऋषिकेशसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. ज्यामुळे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहेब भाविकांना पाच धाम यात्रेचे दर्शन करण्याचे सोईचे होईल. या मार्गावर एकही ट्रेन नाही ह्या ट्रेनचा मार्ग दिल्ली, मेरठ, बिजनौर, हरिद्वार ,ऋषिकेश , देहरादून, श्री हेमकुंड साहेब, केदारनाथ ,बद्रीनाथ ,यमुनोत्री ,गंगोत्री, असा आहे. या शहरांना जाण्या येण्यासाठी ट्रेनचा लाभ मिळेल आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत एक संबंध प्रस्थापित होईल. हिंदू धर्मात पाच धामाचे देवभूमी म्हणण्यात येते सर्व भक्तांची ही इच्छा असते की पाच धामाला दर्शन करून आपला जीवन सफल करावे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गोबिंद घाट ते हेमकुंड साहेब पर्यंत दर्शनासाठी रोपवे चे काम सुरू केले आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन करण्यासाठी सोपे जाईल शीख आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांना लक्ष ठेवता , माननीय प्रधानमंत्री जी आणि ,माननीय अश्विन वैष्णव जी रेल्वेमंत्री, सरदार रवनीत सिंघ बिट्टू जी यांना नम्र विनंती आहे. की ऋषिकेश ट्रेन सुरू करण्यात यावी ही ट्रेन आठवड्यात एकदा किंवा दोनदा केली जावी. ट्रेनचा नाव श्री हेमकुंड साहेब या पांच धाम एक्सप्रेस ये नाव करा हया ट्रेनमुळे भाविकांना सुविधा होईल आणि रेल्वेला सुध्दा ह्याचा फायदा होईल. असे हि शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार मैडम उपस्थित होती.
सध्या सप्ताह मध्ये एक दिवस हुजूर साहेब नांदेड येथून नवी दिल्लीला मराठवाडा संपर्क क्रांति एक्सप्रेस ट्रेन नंबर 12753 चालू आहे. त्याला पुढे ऋषिकेश पर्यंत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यात्रेला सुविधा मिळण्यासाठी आणि रेल्वेच्या उत्पनात वाढ होऊन सचखंड एक्सप्रेस या मार्गाची नंबर एक गाडी होईल. हीबाब लक्षात घेता सचखंड एक्सप्रेस एक नंबर प्लॅटफॉर्म वर आणावी. आणि रेल्वे गाडीची साफ सफाई सुद्धा करावी.
तसेच पूर्णा पटना गाडीला हजूर साहिब नांदेड पासून पटना साहेब पर्यंत चालवावी. पटना आणि संतरागाछीला हावड़ा पर्यंत सोडण्यात यावे. आणि दोन्ही रेल्वे गाड्या आठवड्यात दोन किंवा तीन दिवस चालू करण्यात यावी. असेहि देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर गुरु का खालसा संस्था चे (अध्यक्ष ) कश्मीर सिंघ भट्टी, भूपेंद्र सिंघ कापसे, जसबीर सिंघ कथूरिया, हरभजन सिंघ भट्टी, तरवेंद्र सिंघ बडगुजर, सुरजीत सिंघ मिर्धा, इंदर सिंघ भट्टी सतबीर सिंघ टाक, चरण सिंघ, महेंद्र सिंघ गुलाटी, राकेश भट्ट,आदीं सह अनेकांची उपस्थिती होती.