Sardar Ravneet Singh Bittu ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन – NNL
नांदेड| हजुर साहिब नांदेड येथून ऋषिकेशसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. ज्यामुळे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहेब भाविकांना पाच धाम यात्रेचे दर्शन करण्याचे सोईचे होईल. या मार्गावर एकही ट्रेन नाही ह्या ट्रेनचा मार्ग दिल्ली, मेरठ, बिजनौर, हरिद्वार ,ऋषिकेश , देहरादून, श्री हेमकुंड साहेब, केदारनाथ ,बद्रीनाथ ,यमुनोत्री ,गंगोत्री, असा आहे. या शहरांना जाण्या येण्यासाठी ट्रेनचा लाभ मिळेल आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत एक संबंध प्रस्थापित होईल. हिंदू धर्मात पाच धामाचे देवभूमी म्हणण्यात येते सर्व भक्तांची ही इच्छा असते की पाच धामाला दर्शन करून आपला जीवन सफल करावे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गोबिंद घाट ते हेमकुंड साहेब पर्यंत दर्शनासाठी रोपवे चे काम सुरू केले आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन करण्यासाठी सोपे जाईल शीख आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भ...
